निरागस बालकान दिलेलं उत्तर ऐकून मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही…

निरागस बालकान दिलेलं उत्तर ऐकून मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही…
एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा ( साधारण वय वर्ष आठ) एका कोपर्‍यात बसून ईतरांचा पकडापकडीचा खेळ बघत होता.
कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता.पण खेळत नव्हता.
मी त्याला विचारले…

” बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?”

त्याने खेळावरील नजर न हटवता मला ऊत्तर दिले .

” आय नको म्हनत्या ….”

” आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील !”

त्याने ऊत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला.
मलाच त्याला चिडवण्याची खुमखूमी गप्प बसू देईना….

” मला माहीती आहे, आई तूला खेळायला का नको म्हणते !!! अजिबात अभ्यास करत नसशील !!!”
माझा टोमणा त्याला बरोबर बसला असावा. खेळातला खेळकरपणा त्याच्या चेहर्‍यावरून गायब झाला. त्याने थेट माझ्या नजरेला नजर भिडवली , जगातले विखारी सत्य त्याने मला सांगितले…
” आई म्हनत्या…खेळू नको….खेळून भुक लागल….मग खायला मागशील “
त्याच्या डोळ्यात किंचीत पाणी आले होते. तडातडा ऊठून तो कुठेतरी निघून गेला.
मी अजूनही बेचैन आहे. आणी गेल्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *