देशाच्या नवीन संसदेच उदघाटन महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनीच करायला हवं अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे?..

देशाच्या नवीन संसदेच उदघाटन महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनीच करायला हवं अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे,राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात तसच ते देशाचं सर्वोच्च पद देखील आहे,श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची जेव्हा राष्ट्रपती पदी निवड झाली तेव्हा भाजपाने आम्ही कस एका दलित आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदी बसवलं म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती.याच नवीन संसदेच्या आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मात्र त्यांनी आमंत्रण दिलं नव्हतं,ते देखील ऐका दलित (कोळी) समाजातून आहेत,यावरून भारतीय जनता पक्षाची जातियवादी मानसिकता दिसून येते.

मुळात संघ-भाजपला अशा दलित-मागासवर्गातून येणाऱ्या लोकांचा फक्त मतदानासाठी फायदा करून घायचा असतो,
हे सगळं पद वैगरे सिम्बॉलीक असतात, यांच्या हातातले बाहुले, अशा लोकांना ते कुठलेही निर्णय स्वतः घेऊ देत नाहीत,
यांना फक्त पदावर बसवून त्यांच्या जातीचा वोटबँक ताब्यात घ्यायचा एवढंच त्यांचं टार्गेट असत.

एकीकडे अशा लोकांना पदावर बसावायचं आणि दुसरीकडे त्यांच्या वर्गातून येणाऱ्या लोकांवर अन्यायकारक ठरतील अशे कायदे पारित करायचे, भूमी अधिग्रहण कायदा हे याच उत्तम उदाहरण आहे,

दलितांवरील होणारे अन्यायही यांना दिसत नाही,जेव्हा पीडित कोणी दलित असेल आणि गुन्हेगार उच्चवर्णीय असेल,
तेव्हा संपुर्ण सरकार त्या उच्चवर्णीय माणसाला वाचण्यासाठी प्रयत्न करत असत,हाथरस च ताज उदाहरण आपल्या समोर आहे,

पण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हातून नवीन संसदेचं उदघाटन करून आम्ही खरच मनापासून दलित-आदिवासी लोकांचा सन्मान करतो हे सिद्ध करण्याची संधी आज भाजपाकडे आहे.पण मोदी यांच गेलं 8 वर्षांतील कामकाज बघता हे ते किती आत्ममुग्ध व्यक्ती आहेत, हे आख्या जगाला आता माहीत झालं आहे,साध्या साध्या रेल्वेचे उदघाटनं करण्याची संधी त्यांनी रेल्वे मंत्र्याला देत नाहीत,सगळीकडे तेच हवेत.

याआधीही अनेक पंतप्रधान होऊन गेलेत त्यानींही अनेक उदघाटनं केलीत पण त्यावेळी तिथे त्या खात्याचा मंत्री, इंजिनिअर अशे अनेक लोक हजर असत, फक्त मीच दिसयला पाहिजे असा मीपणा कोणत्याही पंतप्रधानांनी कधी दाखवला नाही.

असो,

बघूया उदघाटनाची संधी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना मिळते की पुन्हा एकदा मोदी !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *