बुलढाणा जिल्ह्यातील समृध्दी महामार्गावर एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात

बुलढाण्यामध्ये एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातातून आठ प्रवाशी सुखरूप बचावले आहेत. ही खासगी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी हा भीषण अपघात घडला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यामधील आठ प्रवासी सुखरुप आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.
सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत ही दुर्देवी घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *